| कर्जत | प्रतिनिधी |
दरवर्षी प्रमाणे यंदाही हुतात्मा कोतवाल नगरमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध स्पर्धा देखील घेण्यात आल्या. तसेच, नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा पार पडला.
कर्जत तालुक्यातील कोतवाल नगरमध्ये सकाळी लहान मुलांची क्रीडा स्पर्धा घेण्यात आली. तर, दुपारनंतर महिलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात 2 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी धावणे, चमचा लिंबू, स्लो सायकलींग, तीन पाय शर्यत अशा स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. तसेच, महिलांसाठी स्लो सायकलिंग, धावणे, चमचा लिंबू, नेमबाजी, बादलीत चेंडू टाकने, फूगा फुगवून ग्लास उचलून पिरॅमिड तयार करणे, संगीत खुर्ची अश्या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी नवनिर्वाचित कमिटीने योग्य प्रकारे कार्यक्रमाची रूपरेषा आखली होती. यादरम्यान, कर्जतच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा पुष्पा दगडे, नगरसेवक संकेत भासे, वैभव सुरावकर, संतोष पाटील, नेहा शिंदे, अतुल कडू, मधुकर घारे, नितीन सावंत, भालचंद्र जोशी, स्वामिनी मांजरे आदींसह अध्यक्ष सतिश जाधव, उपाध्यक्ष अविनाश निगुडकर, सचिव विशाल बदडे, सहसचिव अनिल जाधव, खजिनदार आकशदीप शिवदे, संतोष भासे उपस्थित होते.
कोतवाल नगरमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम
