आरोपीच्या पत्नीकडून मुलासमोरच आईने घेतले 4 हजार


आईला पोलीस काकांनी जेलमध्ये का टाकलं; चिमुकल्याची घालमेल
जेलर सुवर्णा चोरगेची जेलमध्ये रवानगी


। अलिबाग । भारत रांजणकर ।
एका बिल्डरच्या खूनप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीला सामान तसेच सुविधा पुरविण्याकरीता त्याच्या पत्नीकडून अलिबाग जिल्हा कारागृहातील वर्ग 2 च्या महिला जेलर सुवर्णा जनार्दन चोरगे (33) हिने अलिबाग शहरातील जकात नाका येथे भर रस्त्यात आरोपीकडून चार हजार रुपयांची लाच स्विकारली. विशेष म्हणजे व्यायामशाळेत जात असताना तीने ही लाच जेव्हा स्विकारली तेव्हा तीचा लहान मुलगा सोबत होता. चिमुकल्यावर योग्य संस्कार करण्याऐवजी तिने मुलासमोरच लाच घेतल्याने आई या नात्याचा तसेच भावनांनाही तिने काळीमा फासल्याचे वास्तव समोर आले आहे.

जगातील भयानक वास्तवापासून दूर असलेल्या चिमुकल्यासमोर पैसे स्विकारणार्‍या जेलरची रवानगी जेलमध्येच करण्यात आली असून घरात आई नसल्याचे पाहून त्या चिमुकल्याच्या मनाची मात्र घालमेल झाली असेल. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अचानक झडप घातली, तेव्हा ही मुलगी भांबावून गेली होती. आपली आई पोलीस अधिकारी आहे, असा अभिमान वाटणार्‍या या कोवळ्या मुलीच्या मनावर मात्र ही घटना खोलवर कोरली गेली असेल.

विशेष म्हणजे या महिला जेलरचा पती देखील याच जेलमध्ये हवालदार म्हणून नियुक्त आहे. मुळची रामराज येथील सासूरवाशीण असलेल्या जेलर सुवर्णा चोरगे हिच्यावरील कारवाईमुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा केली जात आहे. या घटनेमुळे कारागृहात मोठया प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी नाईक हत्याप्रकरणात कोठडीत असलेल्या पत्रकार अर्णव गोस्वामी यांना मोबाईल पुरविल्याबाबत तत्कालिन कारागृह अधिक्षक अंबादास पाटील यांना कारागृह महानिरीक्षक यांनी निलंबित केले होते. त्यानंतर पाच महिन्याने ही घटना घडली आहे.यावरुन मोठया प्रमाणावर कारागृहांमध्ये गैरप्रकार सुरु असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी गृहखात्याने पावले उचलण्याची गरज असल्याची चर्चा जोर धरीत आहे.

Exit mobile version