| उरण | प्रतिनिधी |
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयात अमली पदार्थ जागृती व सायबर गुन्हे या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात उरण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांदवे यांनी अमली पदार्थविरोधी कायदे व विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी, तसेच सायबर फ्रॉड कसे होतात हे सांगून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विद्यार्थ्यांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थी म्हणून जीवन जगताना कशा पद्धतीने वाटचाल करावी याविषयी दिशा दाखवली व मोलाचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ प्रा. व्ही.एस. इंदुलकर हे होते त्यांनी विद्यार्थ्यांनी शिस्त पालन करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्ता हिंगमिरे यांनी केले. तर, उपस्थितांचे आभार सह कार्यक्रम अधिकारी प्रा. विनिता तांडेल यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606