बदलापूर-अंबरनाथ येथील सायकल रॅली मुरुडमध्ये

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
पर्यटकांनी मुरुड परिसर फुल्ल असतानाच शनिवारी सायंकाळी उशिरा बदलापूर-अंबरनाथ येथील सायकलिंग क्लबची सायकल रॅली मुरुड किनार्‍यावर दाखल झाली. गोवा-मुरूड- रत्नागिरी अशी ही सायकल रॅली आहे. या रॅलीचे नेतृत्व डॉ. नंदकिशोर अहिरे करीत असून, 10 ते 15 सदस्य यात सहभागी आहेत. निसर्गातील बदलांचे परीक्षण, सायकलिंगचे मानवाच्या जीवनातील महत्त्व, व्यायाम, विविध स्तरावर अभ्यास करणे हा मुख्य हेतू असल्याचे डॉ. अहिरे यांनी सांगीतले. शनिवारी मुरुडला मुक्काम करून ही रॅली रविवारी रत्नागिरीकडे निघणार आहे.

Exit mobile version