गोल्डन बॉयसाठी सायकलवारी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत सध्या अनेक भारतीय खेळाडू मैदानात चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत. दरम्यान, भारताचा स्टार गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रा पॅरिससाठी रवाना झाला आहे. त्याने सोमवारी (दि.29) सोशल मिडीयावर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी जात असल्याची पोस्ट शेअर केली होती. दरम्यान, नीरज चोप्रासाठी एका पठ्ठ्याने जवळपास दोन वर्षांत केरळ ते फ्रान्सची राजधानीपर्यंत सायकल चालवली आहे.

फैस असराफ अली नावाच्या या चाहत्याने 15 ऑगस्ट 2022 रोजी केरळ ते पॅरिस असा सायकल प्रवास सुरू केला होता. 30 देशांचा प्रवास करून आणि अंदाजे 22 हजार किलोमीटरचे अंतर कापून तो पॅरिसला पोहोचला आहे. अली ’शांतता आणि एकतेचा’ संदेश देत भारत ते लंडन सायकलच्या मिशनवर निघाला होता. यादरम्यान 17 देशांत सायकलिंग केल्यानंतर गेल्या वर्षी 1 ऑगस्ट रोजी दुपारी तो बुडापेस्टमध्ये थांबला होता, तेव्हा त्याला नीरज तिथेच असल्याचे समजले. अलीने केरळमधील एका प्रसिद्ध प्रशिक्षकाला फोन करून भारतीय संघाला भेटण्यास सांगितले आणि त्यानंतर त्याला नीरजला भेटण्याची संधी मिळाली. तेव्हा नीरज मला म्हणाला की, तू लंडनला जात आहेस तेव्हा पॅरिसला ऑलिम्पिकसाठी का येत नाहीस. म्हणून त्याने तो प्लॅन थोडा बदलला आणि थेट पॅरिसला आला.

Exit mobile version