| नवी मुंबई | प्रतिनिधी |
ऐरोली रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील ठाणे-बेलापूर रस्त्यावर एका टेम्पोमधून चायनीज हॉटेल चालवणाऱ्या गाडीत सिलिंडरचा स्फोट झाला. यात जीवित हानी झाली नाही. मात्र, अनधिकृत फेरीवाले स्टॉलधारकांकडून अनेक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली.
रस्त्याच्या कडेला घरगुती सिलिंडर वापरून अन्नपदार्थ विकणारे अनेक टेम्पो व्यवसाय सर्वत्र सुरू आहेत. याबाबत पोलिसांनी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार कारवाई सुरू केली आहे. वास्तविक ही कारवाई मनपाकडून होणे अपेक्षित आहे. मात्र, रात्री सातनंतर कारवाई होत नसल्याने असे हॉटेल्स रात्री सात-साडेसातनंतर व्यवसाय सुरू करतात. अशाच एका टेम्पोसारख्या गाडीत चायनिक पदार्थ विक्री सुरू होती. मंगळवारी रात्री साडेआठ नऊच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच सिलिंडरचा स्फोट झाला. आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या आगीत गाडी जळून खाक झाली.
चायनीज खाद्यपदार्थाच्या टेम्पोत सिलिंडर स्फोट
