ममदापुरात सिलेंडरचा स्फोट

। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ जवळील ममदापुर गावातील वरची आळी येथील जुन्या घरात असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाला आणि संपूर्ण घराचे नुकसान झाले. घरात असलेल्या आजी या थोडक्यात बचावले असून त्यांच्या कौलारू घराचे मोठे नुकसान झाले आहे.

नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील ममदापुर गावात सीताबाई डांगरे यांचे घर आहे. कौलारू घरामध्ये डांगरे या एकट्याच राहतात. 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता सीताबाई या घरातील किचनमध्ये जेवण बनवत होत्या. त्यावेळी त्या घरगुती सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यात कौलारू घराला आग लागली. सिलेंडर स्फोटचा आवाज एवढा मोठा की शेजारच्या नेरळ, भडवळ गावात हा आवाज पोहचला आणि तेथील तरुण मदतीसाठी ममदापुर गावात पोहचले. नेरळ पोलिसांकडून कर्जत येथील अग्निशमन केंद्राला कळविण्यात आले होते, मात्र अग्निशमन यंत्रणा ममदापुर गावात साडे आठ वाजता पोहोचली आहे. आग विझविण्यासाठी ममदापुर गावातील तरुणांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट पेटत्या घरात घुसून लाकडी साहित्य हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र सिलेंडरचा स्फोट कशामुळे झाला?याबद्दल काहीही माहिती मिळली नाही.

Exit mobile version