| पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबई एअरपोर्ट अदानी गेटवर शुक्रवारी दिबा समर्थक भूमीपुत्र विजय शिरढोणकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो प्रकल्पग्रस्त स्थानिक ग्रामस्थांनी प्रचंड आक्रोश व असंतोष व्यक्त करत विमानतळ प्राधिकरण विभागाचे लक्ष वेधले.
लोकनेते दि.बा समर्थकांच्या योद्ध्यांनी ऐन सणासुदीच्या काळात भरपावसात नोकर भरतीच्या प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यावर आक्षेप घेत जोरदार घोषणाबाजी करत नवी मुंबई विमानतळ कार्यालयाच्या ठिकाणी मोठा जमाव केला होता. यावेळी आमचा उद्देश भूमीपुत्रांना न्याय देणे आहे, आम्हाला आमचं स्वार्थ नाही असे म्हणत प्रलंबित व विलंब होत असलेल्या नोकर भरती, नामकरण मुद्द्यावर सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत भाजप पक्षाचा राजीनामा देणारे दिबा कट्टर समर्थक विजय शिरढोंणकर व अनेक आजी, माजी लोकप्रतिनिधी, स्थानिक भूमीपुत्रांनी यावेळी नोकर भरती प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप होत असून, अशा मुद्द्यांवर छुपे राजकारण होत आहे, असे सांगितले. या विमानतळ प्रकल्पात आमदारांची एक इंचदेखील जमीन गेलेली नाही. भूमीपुत्रांना डावलण्याचा प्रकार कोणी करत असतील, तर दिबांच्या आंदोलनाची पुनरावृत्ती केली जाईल, असा इशारा देण्यात आला.
दि.बा. पाटील समर्थक आक्रमक
