डी मार्टला मराठी भाषेचे वावडे

मनसेचा खळखटयाकचा निर्वाणीचा इशारा
। पनवेल । वार्ताहर ।
महाराष्ट्राची मराठी मातृभाषा आहे. याठिकाणी दुकानातील व्यवहार पाट्या त्याचबरोबर इतर गोष्टींसाठी या भाषेचा वापर करणे आवश्यक आहे. असे असताना डी मार्टकडून या आदेशाचे आणि नियमांचे पालन केल्याचे दिसून येत नाही. व्यवस्थापनाला मराठीचे वावडे असल्याचे एकंदरीतच परिस्थिती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेने आवाज उठवला आहे. राज्य उपाध्यक्ष नितीन काळे यांनी व्यवस्थापनाला पत्र देऊन त्वरित मराठी भाषेचा अवलंब करण्याची मागणी केली आहे. अन्यथा मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
डी-मार्ट हे सर्वाधिक खपाचे स्टोअर आहे. याठिकाणी माफक दरात वस्तू उपलब्ध होत असल्याने ग्राहकांचा ओढा डी मार्टला जास्त आहे. दरम्यान ही वस्तुस्थिती असली तरी डीमार्ट कडून मराठीचा पुरस्कार केला जात नाही. राज्यात अनेक डीमार्टचे स्टोअर आहेत. नाम फलक इंग्लिश दिसून येतो. त्याचबरोबर ग्राहकांना जी बिले दिली जातात त्यामध्ये वस्तूंची यादी सुद्धा इंग्रजीमधून असते. याव्यतिरिक्त ते स्टिकर आहेत तेसुद्धा याच भाषेतून लावले जातात. मराठीच्या वापराकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे एकंदरीत परिस्थिती आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेने आवाज उठवला आहे. प्रदेश उपाध्यक्ष नितीन काळे यांनी कळंबोली येथील डी मार्ट मध्ये जाऊन व्यवस्थापनाला जाब विचारला.

Exit mobile version