दबंग दिल्लीचा यू मुंबावर विजय


| जयपूर | वृत्तसंस्था |

प्रो कबड्डी 2025 स्पर्धेतील 12 व्या हंगामातील 50 वा सामना यू मुंबा आणि दबंग दिल्ली या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात यू मुंबाला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला आहे. दबंग दिल्लीकडून आशू मलिकने दमदार खेळ केला. जयपूरच्या एसएमएस इनडोअर स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात दबंग दिल्लीकडून आशू मलिकने 23 गुणांची कमाई केली. ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली. यासह दबंग दिल्लीने हा सामना 47-26 च्या फरकाने जिंकला. या विजयासह दबंग दिल्लीने 14 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. या सामन्यात दबंग दिल्लीकडून पहिली चढाई करण्यासाठी आशू मलिक आला. यादरम्यान आशूने 1 गुण घेत दबंग दिल्लीला दमदार सुरूवात करून दिली. तर यू मुंबाकडून संदीपने 1 गुण घेत संघाचं खातं उघडून दिलं. 30 व्या ़िफनेस्टा ओपन नॅशनल टेनिस चॅम्पियनशिप नवी दिल्लीत मयाफ दिवशी सुरू होणार. या सामन्यातही अजित चौहानला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे यू मुंबाकडून चढाईची जबाबदारी संदीपकडे होती. दबंग दिल्लीकडून पाचव्या मिनिटाला नीरजने 1 गुण घेत दोन्ही संघांचे गुण 3-3 ने बरोबरीत आणले. सुरूवातीच्या 5 मिनिटांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर यू मुंबाचा संघ 5-4 ने आघाडीवर होता. सामन्यातील 9 व्या मिनिटाला नीरजने 2 गुण घेत दबंग दिल्लीची पिछाडी कमी करत गुणसंख्या 8-7 वर आणली. सुरूवातीच्या 10 मिनिटांचा खेळ झाल्यानंतर यू मुंबाने 9-7 गुणसंख्येसह आपली 2 गुणांची आघाडी कायम ठेवली.

पुर्वार्धातील सुरूवातीच्या 10 मिनिटात यू मुंबाचा संघ आघाडीवर होता. पुर्वार्धातील दुसऱ्या टप्प्यातही यू मुंबाने चांगली सुरूवात केली. सामन्यातील 14 व्या मिनिटाला आशू मलिकने 1 गुण घेत दोन्ही संघांची गुणसंख्या 12-12 ने बरोबरीत आणली. दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत सुरू होती. पुर्वार्धातील शेवटच्या चढाईत आशू मलिकने यू मुंबाला पहिला मोठा धक्का बसला. आशू मलिकने यू मुंबाला ऑलआऊट करत दबंग दिल्लीला आघाडी मिळवून दिली. पुर्वार्धातील 20 मिनिटांचा खेळ झाल्यानंतर दबंग दिल्लीचा संघ 19-17 ने आघाडीवर होता. यासह आशू मलिकने आपलं सुपर 10 देखील पूर्ण केलं. इथून यू मुंबाचा संघ या सामन्यात मागे पडायला सुरूवात झाली.पुर्वार्धात आघाडीवर राहिलेल्या दबंग दिल्लीने उत्तरार्धातही दमदार सुरूवात करत आघाडीत भर घातली.

उत्तरार्धातील सुरूवातीच्या 5 व्या मिनिटाला मलिकने 5 गुणांची करत सुपर रेड केली आणि यू मुंबाला दुसरा मोठा धक्का दिला. यू मुंबाचा संघ दुसऱ्यांदा ऑलआऊट झाला. यासह दबंग दिल्लीने 28-18 गुणांसह 10 गुणांची भक्कम आघाडी घेतली. यू मुंबाचा संघ बचावात आणि चढाईतही मागे पडला. याचा फटका यू मुंबाला बसला. उत्तरार्धातील 11 व्या मिनिटाला आशू मलिकने चढाई करताना 2 गुणांची कमाई करत प्रो कबड्डी लीग 2025 स्पर्धेत गुणांचं शतक पूर्ण केलं. उत्तरार्धातील सुरूवातीच्या 10 मिनिटात यू मुंबाचा संघ तिसऱ्यांदा ऑलआऊट झाला. यासह दबंग दिल्लीने गुणसंख्येत भर घालत 37-19 गुणांसह आपली आघाडी आणखी भक्कम केली. सामन्यातील शेवटची 5 मिनिटे शिल्लक असताना दबंग दिल्लीकडे 19 गुणांची मजबूत आघाडी होती. पहिल्या चढाईपासून यू मुंबावर भारी पडत असलेल्या आशू मलिकने शेवटची 3 मिनिटे शिल्लक असताना आणखी एक सुपर रेड केली. यासह वैयक्तिक 23 गुणांची कमाई केली. ही त्याची प्रो कबड्डी स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. यासह दबंग दिल्लीने 45-25 गुणांसह 20 गुणांची आघाडी घेतली. शेवटी दबंग दिल्लीने हा सामना 47-26 गुणांसह आपल्या नावावर केला.

Exit mobile version