प्रो कबड्डी लीग 2025 स्पर्धा; तेलुगू टायटन्स पराभूत
| पुणे | प्रतिनिधी |
प्रो कबड्डी लीग 2025 च्या क्वालिफायर 2 मध्ये पुणेरी पलटनने तेलुगू टायटन्सला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. सामन्यात पुणेरी पलटनने दमदार पुनरागमन करत 50-45 गुणांनी विजय मिळवला. आदित्य शिंदे आणि पंकज मोहिते यांनी मोलाचे योगदान दिले.
प्रो कबड्डी लीग 2025 स्पर्धेतील क्वालिफायर 2 चा सामना पुणेरी पलटन आणि तेलुगू टायटन्स या दोन्ही संघांमध्ये बुधवारी (29 ऑक्टोबर) पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पार पडली. पण शेवटी पुणेरी पलटनने बाजी मारत स्पर्धेतील अंतिम फेरीत स्थान मिळवले. आता पुणेरी पलटनचा अंतिम सामना दबंग दिल्लीविरुद्ध होणार आहे.दिल्लीतील त्यागराज इनडोअर स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात तेलुगू टायटन्सकडून भरत हुड्डाने सर्वाधिक 23 गुणांची कमाई केली. तर पुणेरी पलटनकडून आदित्य शिंदेने 22 गुणांची कमाई केली. तसेच पंकज मोहितेने आपले सुपर 10 पूर्ण केले.
या सामन्यात पुणेरी पलटनकडून अस्लम इनामदार पहिली चढाई करण्यासाठी आला. त्याने पहिल्याच चढाईत 1 गुण घेत दमदार सुरूवात करून दिली. तेलुगू टायटन्सकडून भरत हुड्डाने बोनस आणि 1 गुण घेत दणक्यात सुरूवात केली. सामन्यातील चौथ्या मिनिटाला पुणेरी पलटनला पहिला धक्का बसला. पुणेरी पलटनचा संघ पहिल्यांदा ऑलआऊट झाला. यासह पलटनवर 10-1 गुणांसह 9 गुणांची आघाडी घेतली. पुर्वार्धातील सुरूवातीच्या 10 मिनिटांचा खेळ झाल्यानंतर तेलुगू टायटन्सचा संघ 13-7 गुणांसह 6 गुणांनी आघाडीवर होता.
पूर्वार्धातील सुरुवातीच्या 10 मिनिटात तेलुगू टायटन्सचा बोलबाला पाहायला मिळाला. पण त्यानंतर पुढील काही मिनिटांमध्ये पुणेरी पलटनने दमदार पुनरागमन केलं. पलटनकडून पंकज मोहिते लागोपाठ गुण घेऊन येत होता. दरम्यान 13 व्या मिनिटाला तेलुगू टायटन्सचा संघ पहिल्यांदा ऑलआऊट झाला. यासह पुणेरी पलटनने 16-12 गुणांसह दमदार पुनरागमन केलं. पूर्वार्धात सुरुवातीला मागे राहिलेल्या पुणेरी पलटनने पुढील काही मिनिटांमध्ये दमदार पुनरागमन केलं. 20 मिनिटांचा खेळ झाल्यानंतर पुणेरी पलटनचा संघ 24-20 गुणसंह अवघ्या 4 गुणांनी पिछाडीवर होता.
उत्तरार्धातही पुणेरी पलटनने दमदार पुनरागमन केलं. उत्तरार्धातील सुरुवातीच्या 5 मिनिटांचा खेळ झाल्यानंतर तेलुगू टायटन्सचा संघ 39- 27 गुणांसह 3 गुणांनी आघाडीवर होता. उत्तरार्धातील नवव्या मिनिटाला पंकज मोहितेने आपलं सुपर 10 पूर्ण केलं. उत्तरार्धातील सुरुवातीच्या 10 मिनिटांचा खेळ झाल्यानंतर पुणेरी पलटनचा संघ 33-32 गुणांसह एका गुणाने आघाडीवर होता. 13 व्या मिनिटाला तेलुगू टायटन्सचा संघ पुन्हा एकदा ऑलआऊट झाला. यासह पुणेरी पलटनने 38-37 गुणांसह पुन्हा एकदा आघाडी घेतली. शेवटची 3 मिनिटे शिल्लक असताना आदित्य शिंदेने 4 गुण घेत पुणेरी पलटनला 45-40 गुणांसह 5 गुणांची आघाडी मिळवून दिली. तेलुगू टायटन्सचा संघ पुन्हा एकदा ऑलआऊट झाला.






