बापरे! 15 अल्पवयीन मुलीस पळविले

। रसायनी । वार्ताहर ।
तालुक्यातील चौक गावामधून 15 या अल्पवयीन मुलीस कुणी अज्ञात इसमाने पळवून नेले आहे. ही मुलगी चौक बाजारपेठ मधील एटीएम मधून पैसे काढण्यासाठी घरातून निघून गेली असता,तिथूनच पळवून नेल्याची तक्रार खालापूर पोलीस ठाण्यात तिच्या आईने यांनी दिली आहे.सुमारे पाच फूट उंची,अंगाने सडपातळ, गहू वर्ण,काळे केस, कानात गोल रिंगा, डाव्या हातावर छ असे इंग्रजी भाषेत गोंदलेले असून निळ्या रंगाचा टॉप त्यावर फुले,जीन्स पॅन्ट असा पेहराव असून पायात सफेद सँडल आहेत,अशा वर्णनाची मुलगी आढळल्यास पो.ह. प्रसाद पाटील 95030002330 अथवा 02192- 275033 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Exit mobile version