कर्नाळा अभयारण्यात बापलेक भरकटले

पोलिसांनी केली सुटका
| पनवेल | वार्ताहर |

कर्नाळा अभयारण्यात विशेषत: किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. शुक्रवारी कर्नाळा अभयारण्यातील किल्ल्यावर आलेल्या बाप-लेकाची अभयारण्यात वाट चुकली. दोन तास अथक प्रयत्न केले असता रस्ता मिळाला नसल्याने पोलिसांना फोनवरुन माहिती दिली. पनवेल तालुका पोलिसांनी अभयारण्यात धाव घेऊन अडकलेल्या दोघांची सोडवणूक केली.


योगेश बिडकर (वय 50) आणि त्यांचा मुलगा वेदांत बिडकर हे अभयारण्यातील किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आले असता वाट चुकले. दोन तास अथक प्रयत्न करूनही योग्य रस्ता सापडत नसल्याने शंभर नंबरवर पोलिसांना फोन करून हकिकत सांगितली. त्याचवेळी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले रवींद्र म्हात्रे आणि पी. एन. घुले यांनी तत्काळ कर्नाळा अभयारण्य गाठून वन विभागाचे कर्मचारी तेजस भोजने व विलास राठोड यांच्या मदतीने शोध घेण्यास सुरुवात केली. काही तासातच शोध घेऊन त्यांना कर्नाळा अभयारण्याबाहेर आणण्यात आले. शिरढोण येथील रहिवासी असलेल्या बाप-लेकांना सुखरूप आणले.

Exit mobile version