भारतीय संघालादादा देणार प्रशिक्षण

| कोलकाता | वृत्तसंस्था |

भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली हे आता आता ऑनलाइन नेतृत्व प्रशिक्षण देणार आहे. इन्स्टाग्रामवरील पोस्टच्या मदतीने त्यांनी ही माहिती दिली. मास्टरक्लास अ‍ॅपवर सौरव गांगुली नेतृत्वाबद्दल ज्ञान देणार आहे. तशी घोषणा त्यानी रविवारी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत केली आहे.

सौरव गांगुलीने भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढलं आणि नव्या उंचीवर नेलं. जेव्हा ‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ला भारताचे कर्णधारपद मिळाले, जेव्हा अनेक भारतीय क्रिकेटर्सवर मॅच फिक्सिंगचे आरोप झाले होते. त्यामुळे भारतीय क्रिकेटचे भविष्य अंधारात दिसत होते. दादाने संकटकाळात संघाचे कर्णधारपद तर सांभाळलेच पण कसे जिंकायचे हेही शिकवले. गांगुलीमुळे वीरेंद्र सेहवागसारखा सलामीवीर, युवराज सिंगसारखा सिक्सर किंग आणि दोन विश्‍वचषक विजेता मिळाला. हरभजन सिंग आणि झहीर खानसारखे दिग्गज गोलंदाज मिळाले. दादांनी आपल्या फलंदाजीच्या स्थानाचा त्याग केला नसता तर भारतीय क्रिकेटला महेंद्रसिंग धोनीसारखा यष्टिरक्षक फलंदाज क्वचितच मिळाला असता.

Exit mobile version