। आगरदांडा । प्रतिनिधी ।
श्रीकृष्ण जन्माष्टमी सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.यादिवशी मुरुड दैवज्ञ ब्राह्मण(सोनार) समाजाच्या वतीने दैवज्ञ भवनात समाज बांधव भाविकां कडुन भजन कीर्तन गात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. गोविंदा आला रे आला या गजरात बालगोपाल -हिमांशु गणेश पोतदार यांनी दहीहंडी फोडुन जन्माष्टमी साजरी करण्यात आली.
यावेळी दैवज्ञ ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष – प्रकाश राजपुरकर, महिला अध्यक्ष- वासंती उमरोटकर, उपाध्यक्ष-जयेश चोडणेकर, आदिंसह दैवज्ञ समाज बांधव महिला वर्ग उपस्थित होते. या पुजेचा मान रविंद्र कारेकर व त्यांच्या पत्नी रश्मी कारेकर यांना मिळाला.यावेळी भगवान श्रीकृष्णाची मृर्तीचे पुजन रविंद्र कारेकर व त्यांच्या पत्नी रश्मी कारेकर यांनी केले. किर्तनकार-प्रकाश पोतदार यांनी भगवान श्रीकृष्णजन्माची पोती वाचण्यात आली. मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या दरम्यान श्रीकृष्ण जन्मकाळ झाला. भाविकांनी गोविंद आला रे आला गोकुळीत नादाला श्रीकृष्णाचा जयघोष करत फटाके फोडून टाळ -नामाचा गजर करत कृष्ण जन्मकाळ उत्सव साजरा करत असतानाच बाहेर पावासांनी जोरदार हजेरी लावली होती.
त्यानंतर पुजेचे मानकरी रविंद्र कारेकर यांनी भगवान श्रीकृष्णांच्या मुर्तीला पंचामृताने अभिषेक करुन कृष्णाला नविन वस्त्र परिधान करून जानव, हार, तुळसी, बेल वाहण्यात आले. लोणी दही साखरेची वाटी केळी, पेढे देवासमोर ठेऊन नैवेद्य दाखवुन गोविंद रे गोपाळा घे गजरात पाळण्यात जोजवले. समाजाच्या महिलां वर्गानी मधुर आवाजात पाळणा गीत सादर करुन मोठ्या थाटात भगवान श्रीकृष्णाची पुजा करण्यात आली. मुरुड दैवज्ञ ब्राह्मण समाजाची दहीहंडी शहरात विशेष महत्त्व असुन या उत्सवात महिला -पुरुष एकत्र येऊन हा उत्सव जोरदार साजरा केला जातो.