| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी भवनसमोर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई, डिजेवर वाजवण्यात येणारे विविध गाणी, तरुणाईचा उसळलेला जनसागर यामुळे अलिबागमधील शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित दहीहंडी महोत्सव सर्वच अलिबागकरांसाठी आकर्षक ठरला.
हजारो तरुणाईच्या प्रचंड गर्दीसमोर अलिबाग कोळीवाडा गोविंदा पथकाने मानाची दहीहंडी फोडण्याचा बहुमान पटकाविला. त्यांना 1 लाख 21 हजार रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, विविध नृत्याविष्कार, पारंपरिक वेशभूषा केलेले नागरिक व ढोलताशांच्या ठेक्यावर हा थरार अलिबागकरांनी अनुभवला