| मुंबई | प्रतिनिधी |
भाजपचे मंत्री,आणि स्थानिक पदाधिकारी हे मनमानी करत आहेत अशा तिखट प्रतिक्रिया शिंदेंच्या नेत्यांकडून येत आहेत. नुकतेच माजी मंत्री रामदास कदम यांनी देखील बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि दापोलीतील स्थानिक नेते मंडळी यांचे कार्यपद्धतीवर टीका केली आहे. त्यामुळे आगामी काळात दापोलीत राजकीय वातावरण तापणार असून माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा भाजप प्रवेश बहुदा अनेकांना रुचला नसेल अशी चर्चा दापोलीच्या राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.
शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजप पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाचे सर्व श्रेय हे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना जाते. दापोली येथे नुकत्याच झालेल्या भाजप पदाधिकारी मेळाव्यात रत्नागिरी जिल्हा भाजप अध्यक्ष केदार साठे यांनी देखील भाजप मध्ये आलेल्या माजी आमदारांचे पुढील वाटचाल उज्वल असेल असे सांगितले होते. त्यामुळे भविष्यात भाजपकडून दळवी हे दापोली मतदारसंघात निवडणूक लढवतील का ? अशी शक्यता अनेकांनी त्या नंतर बोलून दाखवली. तर दळवी सांगितलं उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या या प्रवाहात या अशी देखील भावनिक साद घातली होती. त्यामुळे राजकारणात काहीही घडू शकते याप्रमाणे भविष्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती केली तर राजकीय समीकरणच बदलेल. त्यामुळे देखील शिंदेच्या शिवसेनेचे नेते आक्रमक झाले असावेत अस देखील बोललं जातं आहे.