। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
राजापूर तालुक्याला परतीच्या पावसाने दणका दिला असून सायंकाळी वीजांच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. यावेळी रायपाटण खाडेवाडी येथील जयश्री वामन खाडे यांच्या घरावर वीज कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण घराच्या भितींना तडे गेले असुन विद्युत मिटर बंद पडले होते.







