पावसामुळे वीटभट्टीचे नुकसान

| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यात सकाळी तब्बल दोन तास अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे मोठे नुकसान झाले असून भाजीपाला करणारे शेतकरी, कडधान्य करणारे शेतकरी आणि वीटभट्टी व्यवसाय करणारे शेतकरी याशिवाय फळबागा देखील नामशेष झाल्या आहेत.

तालुक्यातील नागदी पिके घेणार्‍या शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात फळबागा असलेल्या वाडीमधील आंबा आणि काजूचे पीक नामशेष झाले आहे. आंब्याच्या झाडाला आलेला मोहोर आलेल्या यावेळी पावसामुळे कोसळून गेले होते आणि आज त्या झाडांवर राहिलेले अन्य मोहोर देखील सकाळच्या पावसाच्या बरसात यामुळे समूळ नष्ट झाले आहेत.

सर्वाधिक नुकसानीमध्ये कर्जत तालुक्यातील वीटभट्टी मालक यांचा समावेश आहे. तालुक्यातील लाल मातीमुळे कर्जत तालुक्यातील वीट बाजारात लवकर विक्री होत असते.मात्र यावर्षी तालुक्यातील 125 हुन अधिक वीटभट्टी मालक यांचे नुकसान झाले आहे. आज सकाळी पाऊस येईल अशी कोणतीही लक्षणे नसताना पाऊस आल्याने आणि तो धो धो कोसळत राहिल्याने वीटभट्टी मालक यांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती सुनील राणे यांनी दिली.

Exit mobile version