अवकाळीमुळे वीट व्यावसायिकांबरोबर बागायतीचे व पिकांचे नुकसान

| उरण | वार्ताहर |
उरण मध्ये गुरुवारी सायंकाळी ठिक ७ च्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसामुळे विट व्यवसायिकांबरोबर आंबा जांभूळ बागायतीचे व वाल चवळी मूग या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे आंबा बागायतदार शेतकरी,विट व्यवसायिक मोठ्या अडचणीत सापडला आहे.तरी नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी  करत आहेत.

  उरण परिसरातील चिरनेर, कळंबुसरे, कोप्रोली,विंधणे, रानसई,दिघाटी,साई, पुनाडे ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी भात शेतीला जोडधंदा म्हणून भात कापणी नंतर रब्बी पिक म्हणून वाल, चवळी, मूग या पिकाची लागवड करत आहेत.तसेच चिरनेर,साई,दिघाटी ग्रामपंचायत हद्दीतील काही अंशी शेतकरी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी विट व्यवसाय करत आहेत.त्यात बहुतांश शेतकऱ्यांनी आंबा, जांभूळ,काजू सारख्या फळ झाडांची लागवड ही आप आपल्या शेतजमीनीवर केली आहे.मात्र गुरुवारी ( दि१६) सायंकाळी ठिक ७ च्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे,आंबा बागायतदारांचे तसेच विट व्यवसायिकांचे नुकसान केले आहे.त्यामुळे शेतकरी,आंबा बागायतदार,विट व्यवसायिक मोठ्या अडचणीत सापडला आहे.तरी शासनाने सदर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून भरपाई द्यावी अशी मागणी कोप्रोली गावातील शेतकरी,आंबा बागायतदार निर्भय म्हात्रे यांनी केली आहे.

     उरण पुर्व विभागातील आंबा बागायतदार शेतकरी खिशातील पैसे खर्च करून बागायतीच्या झाडांची काळजी घेतो त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी बागायती चा मोठा फायदा होतो.तसेच आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून रब्बी पिकांची लागवड करत आहेत.परंतु दरवर्षी येणाऱ्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतीचे व रब्बी पिकांचे नुकसान होत आहे.उरण पुर्व विभागात गुरुवारी आलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतीचे, रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे.तरी शासनाने नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी –  अनंत बाळाराम म्हात्रे शेतकरी कोप्रोली, 

   कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी विट व्यवसाय करत आहोत पण अवकाळी पावसामुळे विट व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.तरी शासनाने विट व्यवसायिकांना भरपाई द्यावी- गोकुळ परदेशी विट व्यवसायिक चिरनेर 

Exit mobile version