| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील कालवण गावात रमेश चंद्रकांत लाडघरे यांच्या राहते घरावर अचानक वीज पडून घराचे प्रचंड नुकसान झाले. याची माहिती मिळताच तलाठी सजा कालवण यांनी गावात येऊन या घराचा पंचनामा केला.यावेळी पानसई ग्रामपंचायतीच्या सरपंच रुचिता धाडवे,विभागातील जेष्ठ नेते भिकूशेठ धाडवे व ग्रामस्थ उपस्थित होते.
रमेश लाडघरे यांचे कालवण गावातील राहते घर क्रमांक 45 या घरावर शुक्रवारी रात्री अचानक वीज कोसळून घराचे मोठे नुकसान झाले.त्यामध्ये घराची कौले,सागवानी भाले,इलेट्रीक फिटिंग,ढापे,भिंतीला तडे असे जवळपास 96 हजार 375 रुपयांचे नुकसान होऊन तास पंचनामा तलाठी सजा कालवण यांनी ग्रामस्थांना समक्ष केले.या घरमालकाला शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पानसई सरपंच रुचिता धाडवे व जेष्ठ नेते भिकूशेठ धाडवे यांनी केली आहे.