बॉडी बिल्डिंग स्पर्धेत दामोदर हुले यांची सुवर्णपदकाला गवसनी

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन रायगड आणि संलग्न महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने शंभूराजे युवा प्रतिष्ठान श्री 2022 चे आयोजन कळंबोली पनवेल येथे शिवजयंती निमित्ताने करण्यात आले होते.
या स्पर्धेत 55किलो, 60किलो, 65किलो, 70किलो, 75 किलो या खुला गटातील नवोदित बॉडी बिल्डरना खेळण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत सुधागड तालुक्यातील पोटलज खुर्द मधील 55 किलो गटात दामोदर हुले या बॉडी बिल्डिंगमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत दामोदर हुले यांनी 55 किलो गटात सुवर्ण पदकाला गवसणी घातली. जिम ट्रेनर सचिन भुरटे आणि अभिषेक कदम यांनी खूप मेहनत घेऊन या स्पर्धेसाठी तयार केले. या स्पर्धेच्या निमित्ताने रायगडच्या राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंगचा सत्कार करण्यात आला. प्रत्येक गटातील 1 ते 6 नंबर विजेत्यांना मेडल, ट्रॉफी, प्रमाणपत्र देण्यात आले तर खुल्या गटासाठी मेन फिजिग शंभुराजे प्रतिष्ठान श्री 2022 चे ‘किताब विजेता, बेस्ट पोझर, मोस्ट इम्प्रव्हमेंट हे किताब देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version