। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
लोणावळा शहर युवक काँग्रेसने भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा श्री 2022 चे आयोजन 15 मार्च रोजी लोणावळा येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत 55किलो, 60 किलो, 65किलो, 70 किलो, 75 किलो या खुला गटातील नवोदित बॉडी बिल्डिंरना खेळण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत सुधागड तालुक्यातील पोटलज खुर्द मधील 55 किलो गटात दामोदर हुले या बॉडी बिल्डिंरने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत दामोदर हुले यांनी 55 किलो गटात सुवर्ण पदकाची कमाई केली.