। उरण । वार्ताहर ।
होळी धुलीवंदन सणा निमित्त मोठे भिंगार येथे फ्रेंड सर्कल ग्रुपतर्फे धुलीवंदन प्रीमियम लीग 2022 चे आयोजन करण्यात आले होते. फायनलच्या रोमांचित सामन्यात अनिल वरे यांचा जिया इलेव्हन संघ विजेता ठरला तर गौरी इलेव्हन संघ उपविजेता ठरला. या सामन्यामध्ये मन ऑफ द सिरीज निखिल शेंद्रे ठरला, उत्कृष्ट फलंदाज चा मानकरी प्रेम शेंद्रे, उत्कृष्ट गोलंदाज मचींद्र पाटील ठरला. सदर स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी सरपंच, सदस्य,ज्येेष्ठ कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते, आयोजक यांच्या उपस्थितीत होते.