| उरण | प्रतिनिधी |
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) रायगड, नवी मुंबई तर्फे उरण चारफाटा येथे रविवार 14 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता महागाई विरोधी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला जनतेने मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारताचा कम्युनिस्ट पक्षा तर्फे करण्यात आले आहे. फसव्या आणि सर्वसामान्य, मध्यमवर्गीय जनतेच्या जगण्यात अडथळा निर्माण करणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आयोजित महागाई विरोधी मोर्चात मोठया संख्येने सहभागी व्हा असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी कॉ. रामचंद्र म्हात्रे यांनी जनतेला केले आहे. या निषेध मोर्चात सी.आय.टी.यू.,अखिल भारतीय किसान सभा,अखिल भारतीय जनवादी महिला संघटना,डी.वाय.एफ.आय या संघटना सहभागी होणार आहेत.







