| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यात जनगणना 2027च्या पार्श्वभूमीवर जनगणना प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी व अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख बनवण्यासाठी विविध ठिकाणी उभारण्यात आलेले सेल्फी स्टॅण्ड नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. केवळ छायाचित्र काढण्याचे साधन न राहता हे सेल्फी स्टॅण्ड आता आत्मविश्वास, सहभाग आणि सक्षमीकरणाचे प्रतीक आहे. आज मुरूड शेगवाडा येथील कुणाल शरद सतविडकर यांनी 2027 जनगणना करण्यात आल्या नंतर सेल्फी स्टॅण्ड जवळ मी माझी जनगणना केली असा विजयी खुण दाखवत जनगणना ही केवळ शासकीय प्रक्रिया नसून देशाच्या नियोजन आणि विकासाचा पाया आहे .तरी तालुक्यातील नागरिकांना 2027 जनगणना करुन प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन कुणाल शरद सतविडकर यांनी यावेळी केले.







