कार्यवाही करण्याचे रायगडचे जिल्हाधिकारी यांच्याकडून आश्वासन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वेगवेगळ्या प्रश्नांबाबत अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्रशासकीय अडचणी, तक्रारी आणि प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाली. कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच बैठकीस कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महासचिव सुरेश तांबे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगळ, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष राजेश सदावर्ते, रायगड जिल्हाध्यक्ष संजीव मोरे, महसूल संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल सुर्यवंशी, दिव्यांग विभागाचे सचिव शिवाजी बिवराळे, जिल्हा परिषद रायगडचे जिल्हाध्यक्ष खंडू बागुल, कोषाध्यक्ष विकास बडे, कार्याध्यक्ष सचिन ओव्हाळ, चिटणीस संतोष साळावकर, उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कामावर असलेल्या विविध पथकांना मानधन दिले नाही. जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्या लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार, अनुकंपावर नोकरी देणे या मुद्दयांसह पदोन्नती, निलंबन, पेन्शन, कर्मचारी व त्यांच्या कुटूंबांना वैद्यकिय बील देणे, तीन वर्षे झालेल्या कर्मचाऱ्यांचे संकलन बदल करणे. खासगी इसमाला कार्यालयात कामकाज करण्यास बंदी करणे. मागासवर्गीय गृह निर्माण सोसायटीस जागा मिळणे कर्मचाऱ्यांना कार्यालयीन सुविधा देणे अशा अनेक विषयांवर चर्चा झाली. विविध समस्या आणि मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कर्मचाऱ्यांचे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहणार नाहीत. प्रशासकीय स्तरावर सर्व प्रकरणांवर सकारात्मक आणि गतीने निर्णय घेतले जातील, असे आश्वासन या बैठकीत दिले.







