बंधारे ठरतात शेतकऱ्यांसाठी वरदान

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

वनराई बंधारा बांधून पाण्याची पातळी वाढून काही दिवस पाणी येथेच अडविले तर काही महिने या पाण्यामुळे विविध प्रश्न मार्गी लागतात. ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. गुरांच्या पिण्याच्या पाण्यांचा प्रश्न मार्गी लागतो. यामुळे गाव पातळीवर बंधारा बांधून पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना राबविणे काळाची गरज आहे. यामुळे वनराई बंधारे शेतकरी आणी पशू-पक्षांसाठी वरदान ठरत आहे.

पावसाळा संपताच पाण्याचे विविध स्त्रोत्र तळ गाठत असतात. मात्र, काही ठिकाणी हेच पाणी आपण अडवू शकतो. उन्हाळा आला की आपल्याला पाण्याचे महत्व समजते कारण विहीर, तलाव, कूपनलिका, ओढे असे पाण्याचे असलेले स्त्रोत्र तळ गाठण्याची स्थिती निर्माण करतात. पाणी हे आपले जीवन आहे. कारण जल है, तो हम है अशा पध्दतीचे उच्चार सातत्याने करीत असतो. यामुळे मात्र हे आचरणात कोणीही आणत नाही. तुरळक ठिकाणी बंधारे बांधून पाणी अडविले जाते. मात्र, प्रत्येकाने आपले नैतिक कर्तव्ये म्हणून पाणी अडविले पाहिजे. पाण्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही. पशू, पक्षी, झाडे, मानव यासाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो. यामुळे बंधारे यांचे महत्व जाणून घेऊन पाणी अडविले पाहिजे. या पाण्याचा वापर गुरांची तहान भागविण्यासाठी तसेच जंगलातील प्राणी यांना पिण्यासाठी होत आहे. शिवाय शेतकरी वर्ग यावरती भाजी पाल्यांचे उत्पन्न घेतले जाते. यामुळे रोजगारांचा प्रश्न मार्गी लागत आहे.

Exit mobile version