| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा तालुका व शहर महिला संघटना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मंगळवारी दि.9 घनसार हॉल येथे महिलांकरिता भव्य नृत्यस्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. श्रावण महिन्यात खास महिलांकरिता त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा होणार आहे. यामध्ये तालुक्यातील खेडोपाड्यातील गाव वाडी, शहरातील महिला मंडळ, महिला कला पथकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपल्यातील कलागुण दाखवून द्यावेत असे आवाहन म्हसळा तालुका महिला अध्यक्षा सोनल घोले यांनी केले आहे







