| पनवेल | वार्ताहर |
पनवेल महानगरपालिका स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत ‘घरोघरी तिरंगा’ जनजागृती अभियान राबवित आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 5 ऑगस्ट खारघर येथील सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांना ‘घरोघरी तिरंगा’ जनजागृती अभियानात सामील करून घेण्यात आले. यावेळी उपायुक्त विठ्ठल डाके यांनी ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. झेंडा फडकविण्याबाबतचे निर्देश, सूचना सांगितल्या, तसेच अभियान यशस्वी करण्यासाठी शुभेच्या दिल्या.
यावेळी सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, मुख्याध्यापक डॉ. मंजुषा देशमुख, एनएसएस प्रोग्रॅम ऑफिसर डॉ.सुनीता पाल, सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनियरिंगचे एनएसएसचे 250 विद्यार्थी मागर्दर्शन शिबिरात सहभागी झाले.