‘दंगल गर्ल’ सुहानी भटनागरचे निधन

वयाच्या 19 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

| मुंबई । प्रतिनिधी ।

आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुहानी भटनागरच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 19 व्या वर्षी सुहानीने या जगाचा निरोप घेतला आहे.

अभिनेत्री सुहानीने ‘दंगल’ चित्रपटात आमिर खानच्या छोट्या मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूरच होती. आता अचानक सुहानीच्या निधनाचं वृत्त समोर येत आहे. फरीदाबादमध्ये राहणाऱ्या सुहानीच्या निधनाचं कारण तिच्या संपूर्ण शरीरात पाणी भरल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी तिचा एक अपघात झाला होता. या अपघातात तिच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं. अपघातानंतर उपचारादरम्यान तिने जी औषधं घेतली, त्याचा साइड इफेक्ट होऊन हळूहळू तिच्या शरीरात पाणी भरले. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते.

Exit mobile version