। नाशिक । वृत्तसंस्था ।
आठ दशकांहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानकोकिळा लता मंगेशकर यांनी वयाच्या 93 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अस्थींचे गुरुवारी नाशिमध्ये गोदातीरावरील रामकुंडात विसर्जन करण्यात आले. लता दीदींच्या अस्थी विसर्जनासाठी समस्त मंगेशकर परिवार उपस्थित होता. आदिनाथ मंगेशकर यांनी अस्थींचे विसर्जन केले. लतादीदी यांच्या अस्थी विसर्जनासाठी नाशिकमध्ये आल्या आहेत, हे समजताच अनेक रसिकांनी गोदाकाठावर गर्दी केली होती.