पुढील 24 तास रायगडकरांसाठी धोक्याचे?

I अलिबाग I प्रतिनिधी I

शनिवारी रात्री 10 वाजल्यापासून अलिबाग तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात धोक्याचा इशारा असल्याचा मेसेज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. पावसाने रायगड जिल्ह्याला पुरतं झोडपून काढलं आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

हवामान विभागा, कुलाबा यांच्या माहितीनुसार दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच पूरज्यन्य परिस्थिती असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

The Review

Exit mobile version