| पनवेल | वार्ताहर |
तळोजा प्रवेशद्वाराच्या भुयारी मार्गांवरील स्त्याच्या दोन्ही बाजूला लावण्यात आलेल्या जाहिरातींचे फलक वाहनचालक, तसेच नागरिकांसाठी धोकादायक ठरत होते. ट्रक, डम्पर अशा अवजड वाहनांच्या घर्षणामुळे फलक निखळले होते. त्यामुळे संबंधित फलक पडून अपघात होण्याची शक्यता असल्याने ते हटवण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात आली होती. त्याची तत्काळ महापालिकेने दखल घेऊन संबंधित धेाकादायक फलक हटविण्यात आले आहेत. खारघर, तळोजामधील सर्व मुख्य रस्त्यांवरील दुभाजक आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला दहा फुटांवर लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांमुळे शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे.