वरसगाव पेट्रोलपंपासमोर धोकादायक खड्डे

। कोलाड । वार्ताहर ।
वरसगाव पेट्रोल पंपासमोरील रस्त्याची पहिल्याच पावसाने चाळण केली आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणार्‍यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अलिकडेच या मार्गावर दुचाकीवरुन प्रवास करताना एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे अजून किती प्रवाशांचा बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार, असा संतत्प सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

पेट्रोल पंपापासून भिरा फाट्यापर्यंत अतिशय भयानक खड्डे पडले आहेत. परिणामी, रात्रीच्यावेळी वाहनचालकांना खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुचाकी वाहनचालकाला तर पाय जमिनीला टेकत शिताफिने भर पावसात मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रवाशांच्या अपघाताची वाट न पाहता त्वरित खड्डे भरून होणारा धोका टाळावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version