। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
दापोलीत ढगफुटी सदृश पावसानं रात्रभर धुमाकूळ घातला आहे. पावसाच्या थैमानानं शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. दापोली शहरातील केळकर नाका शिवाजीनगर, भारत नगर, नागर गुडी, प्रभू आळी, जालगाव खलाटी या परिसरात पुराचे पाणी चार ते पाच फूट वाढले अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने लोकांची धावपळ उडाली आहे. दापोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री एक वाजेपर्यंत शहरातला पूर कायम होता. एक नंतर पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे पाणी ओसरले आहे. मध्यरात्रीनंतर लोक साखरझोपेत असताना घरावर थाप पडली आणि घरे खाली करा असा आवाज आला आणि बहुतांश गावकर्यांनी रात्र जागूनच काढली. हा प्रकार होता दापोली तालुक्यातील हर्णै गावाला चांगलेच झोडपून काढले आणि बाजारपेठेमध्ये सर्वत्र 3 ते 4 फूट पाणी घुसले. त्यामुळे रात्री अचानक तीन वाजता लोकांना घरे खाली करण्यास सांगण्यात आले. साखरझोपेत असलेल्या लोकांना काही काळ नेमका प्रकार कळला नाही. अनेक लोकांचे रात्रीच स्थलांतरही करण्यात आले. अचानक हर्णै गावाला पुराचा वेढा पडला आणि रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे भीतीपोटी लोकांनी रात्र जागून काढली. हर्णै गावातील अनेक वाड्यामध्ये अशा प्रकारची पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने लोकांमध्ये चिंता पसरली आहे. रात्री एक वाजेपर्यंत शहरातला पूर कायम होता. एक नंतर पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे पाणी ओसरले आहे. दुसरीकडे चिपळूणमध्येही रात्रभर पाऊस कोसळत होता. त्यामुळे पुराच्या भीतीत नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. पावसानं थोडी उसंत घेतली असली तरी येत्या काही तासांत पाऊस असाच सुरूच राहिला तर समुद्र भरतीच्या वेळी शहरात पाणी शिरण्याची शक्यता आहे. दापोली, चिपळूणला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हर्णै समुद्रकिनारी बोट बुडाली
समुद्रकिनारी मंगळवारी सकाळी पुन्हा एक बोट भरकटून बुडाली. तालुक्यातील आंर्ले येथे सोमवारी एका बोटीला जलसमाधी मिळाली. तिला वाचवायला गेलेली बोट गाळात रुतली होती. सुदैवाने ती वाचली. आंजर्लेपाठोपाठ हर्णै येथे बोट बुडाली आहे. पाच सिलेंडरची ही बोट मंगळवारी सकाळी उधाणाच्या भरतीत वार्यावर भरकटली. तिला वाचवण्यासाठी स्थानिक मच्छीमारांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण बोटीला जलसमाधी मिळली.