एकादशी-ईदनिमित्त हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

अल्पोपहार वाटपातून दिला सामाजिक समतेचा संदेश
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
यंदा हिंदू बांधवांचा आषाढी एकादशी आणि मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हे पवित्र मानले जाणारे धार्मिक सण योगायोगाने एकाच दिवशी आले. अशातच पालीत आषाढी एकादशी -ईदनिमित्त हिंदू-मुस्लिम बांधव ऐक्याचे अनोखे दर्शन घडले. यावेळी एकमेकांना शुभेच्छा देत हिंदू मुस्लिम बांधवांनी पायी दिंडीतील वारकरी बांधवांना चहापान व अल्पोपहाराचे वाटप करीत सामाजिक समतेचा व ऐक्याचा संदेश दिला.
यावेळी सु.ए.सो.चे उपाध्यक्ष रवींद्र लिमये, सभापती सुलतान बेणसेकर, चंद्रकांत घायले, गायकवाड, संतोष कांबळे, बबली शिंदे, सखाराम दिघे, अखिल फणकर, इमदाज पठाण, इजाज पानसरे, इसाक पानसरे, पप्पू परबलकर आदींसह हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version