नांदगावमध्ये दासनवमी उत्साहात

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील श्री समर्थ सोमवार भजनी मंडळातर्फे मंगळवारी(दि.05) माघ कृष्ण नवमी अर्थात दासनवमी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

यानिमित्ताने मुख्य बाजार पेठेत असलेल्या नांदगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या केशव रंगनाथ जोशी यांच्या निवासस्थानी कीर्तनकार धनंजय गद्रे यांचे सुश्राव्य कीर्तन, स्थानिक भजनी बुवांनी सादर केलेली संगीत भजने, दासबोध ग्रंथाचे पठण, स्वामी समर्थांच्या संस्कारक्षम कथांचे वाचन, महाआरती आदी कार्यक्रम करण्यात आले होते. कीर्तन ऐकण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमासाठी श्रीसमर्थ सोमवार भजनी मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version