। कोर्लइ । वार्ताहर ।
जगदगुरु श्रीस्वामी नरेंद्र महाराज संप्रदायातर्फे मुरुड तालुक्यातील मजगांव, आदाड, उसरोली व वालवटी येथे शनिवारपासून माधुकरी अभियानास प्रारंभ करण्यात आला.
या अभियानांतर्गत 10 सेवा केंद्रांमध्ये 50 गावांत माधुकरी अभियान राबविण्यात येत असून, 5 टन तांदूळ जमा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या माधुकरी अभियानातून जमा झालेल्या धान्यातून नाणीज येथील संस्थानात गोरगरीबांना तसेच भक्तगणांना दररोज महाप्रसाद दिला जातो. ज्या ज्या भाविकांनी या अभियानास प्रतिसाद देऊन सहकार्याचा हात पुढे केला, त्या भाविकांचे श्री नरेंद्र महाराज संप्रदायातर्फे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
कार्यक्रमाचे औचित्य साधून यावेळी संतसंगातील दहा सेवा केंद्रांतील अध्यक्ष, महिला अध्यक्ष व भक्त गणांचा यथोचित सन्मान करण्यात येत आहे. श्री संप्रदायाचे मुरुड तालुका अध्यक्ष अंकुश वाडकर, सचिव जितेंद्र पाटील, कमांडर, जिल्हा महिला अध्यक्षा अंजली जगताप, तालुका महिला अध्यक्षा प्राची पाटील, महेश मोठेबुवा, संतोष चोरघे, सुधीर पुळेकर, भजनी बुवा मधुकर कुद्रुसे, अनंता भगत यांसह भक्तगण व महिला वर्ग मोठ्या संख्येने अभियात सहभागी झाला होता.