| कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील अमृतधारा गोशाळा धगडवाडी येथे गोकर्ण मंडलाधीश्वर श्रीमत जगद्गुरु शंकराचार्य राघवेश्वर भारती, महास्वामीजी रामचंद्रपूर मठ होसनगर यांच्या प्रमुख उपस्थितीत आराधना महोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी चारी वेदांचा अभ्यास असणारे पंडित तसेच 300 पेक्षा जास्त शिष्यगण उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन मा-गो प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णा भट, प्रकाश भट परिवार मुंबई डोंबिवलीचे सर्व सदस्यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. धगडवाडी गो शाळेचे राघवेश्वर भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य सुरु असून, या गोशाळेत 250 ते 300 गायी व बैल आहेत.