दशपर्णी अर्क ठरतोय शेतकर्‍यांसाठी गुणकारी

सेंद्रिय खताला मागणी
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील बार्डी गावातील तरुण हेमंत कोंडीलकर यांनी सेंद्रिय खतांची निर्मिती केली आहे. सेंद्रिय खतांच्या साहाय्याने भाजीपाला शेती करणार्‍या शेतकरी यांना सेंद्रिय खत मदतगार ठरत आहे. दरम्यान, दशपर्णी अर्क सेंद्रिय शेती करणार्‍या शेतकर्‍यांसाठी फायद्याचा ठरत असून सेंद्रिय खते वापरून केलेल्या शेतीला बाजारात चांगली मागणी देखील आहे.
हवामान बदलामुळे शेतीमधील पिकांवर देखील परिणाम होत असून उत्तम आरोग्यासाठी सेंद्रिय खते यांच्यापासून केल्या जाणार्‍या शेतीला महत्व आले आहे. हे लक्षात घेऊन कर्जत तालुक्यातील बार्डी येथील शेतकरी हेमंत कोंडीलकर यांनी दशपर्णी अर्क शोधून काढला आहे. कोंबडी खते यापासून सेंद्रिय खतांची निर्मिती कोंडीलकर यांनी केली असून त्या दशपर्णी अर्क यांचा प्रसार त्यांनी भाजीपाला शेती करणार्‍या शेतकर्‍यांच्या घरी जाऊन दशपर्णी अर्काची माहिती द्यायचे. जेपी वर्षभर सेंद्रिय शेतीसाठी प्रयत्न केल्यानंतर दशपर्णी अर्क यशस्वी ठरत असून शेतकर्‍यांच्या पसंतीला उतरलेल्या या दशपर्णी अर्कामुळे कर्जत, खालापूर आणि अंबरनाथ तालुक्यातील 100 हुन अधिक भाजीपाला उत्पादक शेतकरी यांनी सेंद्रिय खते यांचा वापर करून शेती केली आहे. बाजारात सेंद्रिय खते आणि रासायनिक खते यांच्यापासून पिकवलेली भाजीपाला वेगवेगळ्या दरात विकली जात असते आणि सेंद्रिय खते यांच्यापासून पिकवलेली भाजी यांचा चढा भाव शेतकर्‍यांना मिळत असतो.
हेमंत कोंडीलकर यांनी तयार केलेल्या दशपर्णी अर्क यांचा वापर करून गुडवन येथील शेतकरी नरेश धोंडु खडे यांनी आपल्या शेतात मेथी, कोथिंबीर चवळी, भेंडी, मका, टोमॅटो यांचे उत्पादन घेतले आहे. रासायनिक खतांना पर्याय म्हणून कोंबडी खत, दशपर्णी यांचा वापर केला तर शेतकरी बांधवांना अल्प दरात विषमुक्त भाजीपाला पिकवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

आम्ही सेंद्रिय खते यांचा अर्क बनविला आहे त्यापासून पोल्ट्री फार्म मधील दुर्गंधी नाहीशी झाली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्याने आता सेंद्रिय खते यांच्या वापरापासून बनवलेली भाजी चाखायला मिळू शकते, त्याचा आस्वाद घ्या. – हेमंत कोंडीलकर, शेतकर

Exit mobile version