| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एम आयडीसी परिसरातील कासप येथील दशरथ अर्जुन कदम यांची माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल तालुका सहचिटणिसपदी नियुक्ती करण्यात आली. दशरथ गायकर यांचा जनसंपर्क, पक्षवाढीसाठी योगदान पाहता त्यांची सहचिटणिसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर विश्वास ठेवून जी जबाबदारी दिली आहे, ती यशस्वीपणे पार पाडणार, असा विश्वास गायकर यांनी बोलून दाखविला.
शेकाच्या तालुका सहचिटणिसपदी दशरथ गायकर
