| पनवेल | प्रतिनिधी |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पनवेल तालुक्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. दशरथ मुंडे यांची मनसे पनवेल उपतालुका अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, तालुकाध्यक्ष सोनवणे यांनी निवडीचे पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी दीपक पाटील, पनवेल तालुका सचिव अल्पेश कडू, निर्दोष गोंधळी उपस्थित होते. दशरथ मुंडे यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. या निवडीबद्दल बोलताना मुंडे यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे आणि वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले असून, तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मी कटीबद्ध राहीन, असा विश्वास व्यक्त केला.
दशरथ मुंडे यांची उप तालुकाध्यक्षपदी निवड
