आयपीएलच्या दोन सामन्यांच्या तारखा बदलल्या

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

यंदा पण आयपीएल 2024 चा थरार भारतात अतिशय भव्य पद्धतीने खेळवला जात आहे. चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. आधी बीसीसीआयने आयपीएल 2024 च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यानंतर दुसर्‍या टप्प्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. पण बीसीसीआयने आता आयपीएल 2024 च्या मधल्या वेळापत्रकात बदल केला आहे. दोन सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना (दि.17) एप्रिल रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार होता, परंतु आता हा सामना (दि.16) एप्रिल रोजी होणार आहे. याशिवाय गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना (दि.16) एप्रिल रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार होता, जो आता (दि.17) एप्रिल रोजी खेळवला जाईल. या दोन सामन्यांमध्येच बदल झाले आहेत.

Exit mobile version