दत्ता गायकवाड यांचे निधन

| मुंबई । वृत्तसंस्था |

भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार दत्ता गायकवाड यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. यांनी वयाच्या 95 व्या वर्षी बडोद्यातील राहत्या घरी अखेरचा श्‍वास घेतला. गायकवाड हे भारतीय संघाचे सर्वात वयस्कर खेळाडू होते. ते भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे ते वडील होते. दत्ता गायकवाड यांच्या निधनाने कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच क्रिकेट विश्‍वावर शोककळा पसरली आहे. गायकवाड यांनी इंग्लंड विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. गायकवाड यांनी कसोटी कारकीर्दीत 1952 ते 1961 या दरम्यान 11 सामन्यांमध्ये 350 धावा केल्या होत्या. गायकवाड यांनी 1959 साली इंग्लंड दौर्‍यावर भारतीय संघाची कॅप्टन्सी केली होती. दत्ताजीराव यांनी क्रिकेटचा वारसा आपल्या मुलाला दिला.

Exit mobile version