दत्ताराम पोटफोडे यांचे निधन

। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील शिरवली गावचे रहिवासी, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम नारायण पोटफोडे यांचे वयाच्या 72 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले,एक मुलगी, सुना, जावई, भाऊ, नातवंडे असा परिवार असून, त्यांचे दशक्रियाविधी 20 जानेवारी रोजी तर अंतिम धार्मिकविधी 23 जानेवारी रोजी शिरवली येथील राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version