दत्तात्रय कदम यांचे निधन

। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ येथील आर्टिस्ट दत्तात्रय बाळकृष्ण कदम यांचे वयाच्या 67 व्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नेरळ ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अलका कदम यांचे ते पती होते. नेरळ मधील साड्यांच्या तसेच कपड्यांच्या डिझाईन बनविणारे म्हणून दत्तात्रय बाळकृष्ण कदम यांचे नाव आघाडीवर होते. कदम हे सकाळी मॉर्निंग वॉक आल्यावर त्यांच्या छातीत दुखू लागले आणि म्हणून त्यांनी जवळच असलेल्या खासगी डॉक्टर यांचे क्लिनिक गाठले. ते दवाखान्यात बाहेर खुर्चीवर बसले असता त्याच खुर्चीवर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले. कदम यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली तसेच एक भाऊ आणि पुतणे असा परिवार आहे.

Exit mobile version