वकील संघटनेच्या अध्यक्षपदी दत्तात्रेय नवाळे

| उरण | वार्ताहर |
उरण तालुका वकील संघटनेची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. या निवडणुकीत अध्यक्षपदी दत्तात्रेय नवाळे हे बहुमताने निवडून आले. अ‍ॅड. दत्तात्रेय नवाले यांची अध्यक्षपदी निवड होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

2022-23 सालाकरिता निवड झालेल्या कार्यकारणीत उपाध्यक्षपदी भारती भोईर, किशोर ठाकूर, सचिवपदी प्रसाद पाटील, खजिनदारपदी अर्चना माळी, ऑडिटर संतोष पाटील, सभासद अझीमन रईस अहमद अन्सारी, वृषाली पाटील, विपुल ठाकूर, धीरज डाकी यांचा समावेश करण्यात आला आहे.

Exit mobile version