| अलिबाग | प्रतिनिधी |
स्त्रीशक्तीचा सन्मान अधोरेखित करणारा जागतिक महिला दिन, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण यश संपादन केलेल्या सावित्रीच्या लेकींचा शेतकरी भवन अलिबाग येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता सावित्रीरत्न पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात संसार, घरची कामे सांभाळून आपली स्वप्नं जगणाऱ्या आणि पूर्ण करणाऱ्या नारीशक्तीचा सन्मान करण्याचा आणि त्यांना प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न शेकाप कायमचं करीत आलेला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा नृपाल पाटील आणि अलिबाग तालुका महिला आघाडी प्रमुख प्रिती पाटील महिला आघाडीच्या सदस्या यांच्या वतीने एक सावित्रीरत्न म्हणून आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविणार्या, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला भगिनींचा नारीशक्तीचा हा गौरव आहे.
या मध्ये क्रीडा क्षेत्राकरिता सर्विका म्हात्रे, रचना म्हात्रे, काळभैरवनाथ क्रीडा मंडळ मोरोंडे, शैक्षणिक क्षेत्राकरिता सिया अग्रवाल, अंगणवाडी सेविका श्रीमती निता गोंधळी, सीआरपी (बचत गट) क्षेत्राकरिता मेघना पाटील, योगा फिटनेस करिता सायली वैद्य, विद्या मोहिते, कला क्षेत्रात ज्योति राऊळ, पायलट क्षेत्राकरिता कॅप्टन कृतज्ञा हाले, शितळ ससाणे, वैद्यकीय क्षेत्राकरिता प्रसन्ना नाखवा, वकीली क्षेत्राकरिता निहा राऊत, पत्रकारीता क्षेत्राकरिता माधवी सावंत, फॅशन क्षेत्राकरिता प्रिती झुंझारराव, युथ आयकोंन महिला अंकिता राऊत, बँकिंग क्षेत्राकरिता शिल्पा पाटील, आदिवासी कर्तुत्ववान महिला प्रेमा दरोडा, पार्वती मेंगाळ, शिक्षण क्षेत्राकरिता पूनम मढवी, रसिका मढवी, खाद्य क्षेत्राकरिता दीप्ती राऊळ, विनया पाटील, कोळी व्यावसायिका अनुजा कुलपे, सरपंच रोहिणी पाटील, कंडक्टर क्षेत्राकरिता संगीता म्हात्रे, उद्योजिका या क्षेत्राकरिता रत्नप्रभा बेल्हेकर, श्रावणी लाल, आशा वर्कर क्षेत्राकरिता रेश्मा पाटील, विधवा कर्तुत्ववान महिला अनिता शेंडे, हर्षला ठाकुर, स्नेहल कंदु, सामाजिक कार्याकरिता तपस्वी गोंधळी आदीं महिलांना सन्मानित करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाकरिता प्रमुख मान्यवर शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया पाटील, माजी आमदार पंडित पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अँड. आस्वाद पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्या भावना पाटील, तालुका चिटणीस अनिल पाटील, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा चित्रलेखा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या प्रियदर्शनी पाटील, उपनगराध्यक्षा अँड. मानसी म्हात्रे, आंबेपूर सरपंच सुमन पाटील, शेकापचे नेते संदीप घरत, अलिबाग नगरपरिषद नगरसेविका, ग्रामपंचायत सदस्या आदि मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित राहणार आहेत.