डेव्हिड वॉर्नरचे द्विशतक

| नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने क्रिकेट विश्‍वात इतिहास रचताना एक मोठा विक्रम केला आहे. त्याने आपला 100वा कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला, ज्यामध्ये त्याने द्विशतक झळकावले. सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघामध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर याने एक दैदिप्यमान कामगिरी केली आहे. त्याने आपल्या 100व्या कसोटी सामन्यात शतक झळकावत मैलाचा दगड पार केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील 10वा तर ऑस्ट्रेलियाचा दुसरा फलंदाज ठरला आहे.

आता वॉर्नरने कारकिर्दीतील 100व्या कसोटीत शतक झळकावून हा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना मेलबर्नमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात वॉर्नरने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात द्विशतक झळकावले आहे. त्याने 254 चेंडूत 200 धावांची खेळी खेळली. यादरम्यान वॉर्नरने दोन षटकार आणि 16 चौकार लगावले.

Exit mobile version